नवी दिल्ली । ‘नमो टीव्ही’वर कोणताही निवडणूक विषयक कंटेंट प्रसारित करण्यासाठी आता निवडणूक आयोगाच्या कमिटीची मंजुरी घ्यावी लागणार आहे. तसेच सर्व आधीचे निवडणूक विषयक कंटेंट लवकरात लवकर काडून टाकण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत. ‘नमो टीव्ही’ चॅनलविषयी आम आदमी पक्षानं प्रश्न उपस्थित केले होते, तर काँग्रेसनं या चॅनलविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती आणि हा प्रकार बेकायदेशीर असल्याचं म्हटलं होतं.

भाजप हे टीव्ही चॅनेल चालवत आहे. या चॅनेलवरील कोणत्याही कंटेंटच्या प्रसारणासाठी पूर्व प्रमाणपत्र घेण्यात आलेलं नाही. या चॅनेलवरील कंटेंट राजकीय असून ते आचारसंहितेच्या अंतर्गत येत आहे, असं आयोगानं स्पष्ट केलं आहे.

कंटेंट तपासला जाणार

आचारसंहिता लागू झाल्यानंतरही ‘नमो टीव्ही’ लाँच झाल्यामुळे निवडणूक आयोगाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे बुधवारी स्पष्टीकरण मागितलं होतं. याआधी याच आठवड्यात आम आदमी पक्षाने कथितरीत्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या या चॅनलविरोधात तक्रार केली होती. या तक्रारींची दखल घेत नमो टीव्हीवर प्रसारित केला जाणारा कंटेंट तपासला जाणार आहोत, असं पत्रक निवडणूक आयोगानं जारी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *