आता पर्यंत पुरूषांचा क्रिकेट संघ आणि महिलांचा क्रिकेट संघ असे दोन क्रिकेट सामने तुम्ही पाहिले आहेत. पण यंदा क्रिकेट विश्वात प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला व पुरुष यांच्यात एकत्र सामने खेळविले जाणार आहेत. #ChallengeAccepted मोहीमे अंतर्गत या सामन्याचे आयोजन करण्यात येणार आहे. टी-२० षटकांच्या या सामन्याला मिक्स जेंडर टी-ट्वेंटी मॅच असे नाव देण्यात आले आहे.

मिक्स जेंडर टी ट्वेटी सामन्याची जाहिरात करणारा एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. मिताली राज, हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णमुर्ती या महिला क्रिकेटपटूंसह विराट कोहली आगामी काळात एकाच संघातून एकत्र खेळताना दिसतील असा संदेश त्या व्हिडीओत देण्यात आला आहे.

आजच्या आधुनिक काळातही आपल्या समाजात स्त्री पुरुष समानता आभासीच आहे. महिला क्रिकेटमध्ये मागील काही वर्षांत बरीच सुधारणा झालेली आहे. परंतु आजही प्रेक्षक पुरुष खेळाडूंच्या तुलनेने महिला खेळाडून कमी लेखतात. महिला क्रिकेटला खेळपट्टीचा आकार, संधी, पगार, प्रक्षेपण आणि चाहत्यांचा पाठींबा यात अजूनही दुय्यम स्थान मिळत आहे. परंतु महिलाही पुरुषांइतक्याच महत्त्वकांक्षी आहेत, त्यांच्याकडेही पुरुषांइतकीच क्षमता आहे. स्त्री पुरुष समानता दाखवण्यासाठी मिक्स जेंडर टी-ट्वेंटी सामना खेळवला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *