अमित शहा आणि नरेंद्र मोदी ही जोडगोळी देशाला घातक आहे. दुर्दैवाने काही बरं-वाईट झालं आणि ते निवडून आले तर ते निवडणुकाच बंद करून टाकतील. तुमची गळचेपी होईल. तुमचे लोकतांत्रिक अधिकार हिरावले जातील. ज्यांनी पाच वर्षांत पत्रकारांना उत्तर दिलं नाही ते तुम्हाला काय उत्तर देणार ???… अशी शंका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज गुढीपाडव्यानिमित्त दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर उपस्थित केली.

“देशावर अमित शाह आणि नरेंद्र मोदीं यांचं संकट आहे. ते टळावं यासाठी जे जे म्हणून शक्य आहे ते मी सर्व करेन असं राज ठाकरे म्हणाले. इंदिरा गांधी यांना बांग्लादेशच्या निर्मतीवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघांनी पाठिंबा दिला होता. आणीबाणीनंतर असंख्य काँग्रेस समर्थकांनी इंदिरा गांधीविरोधात मतदान केलं होतं. तर इंदिरा गांधींची हत्या झाली तेव्हा जनता पक्षाच्या समर्थकांनी राजीव गांधींना मतदान केलं होतं. त्या त्या वेळी जी परिस्थिती असते ते पाहून निर्णय घ्यावे लागतात , देश ज्या ज्या वेळी संकटात आहे त्यावेळी वेगळा विचार करायला हवा.” अशी सडेतोड भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.

डिजिटल इंडियाची आजची स्थिती काय आहे? हे दाखवण्यासाठी राज ठाकरे यांनी ‘हरिसाल’ या डिजिटल गावाची फिल्म दाखवली. सरकारच्या ‘मी लाभार्थी’ या घोषणेवरही त्यांनी टीका केली. मी लाभार्थी या जाहिरातीमध्ये काम केलेल्या युवकाची मुलाखत त्यांनी दाखवली. तो मुलगा हरिसाल येथे एक छोटं दुकान चालवतो. त्याच्या दुकानात पेटीएम किंवा स्वाइप मशीन नसल्याचं त्याने सांगितलं. ही फिल्म दाखवल्यानंतर राज ठाकरे म्हणाले ‘भाजपचे दावे खोटे आहेत. पंतप्रधान मोदी हे उत्तर तर देत नाहीत निदान भाजपने तरी द्यावीत.’

गुजरातचे मुख्यमंत्री असतानाचे नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान झाल्यानंतरचे मोदी यातला विरोधाभास काही क्लिपस् च्या माध्यमातून दाखवत ठाकरेंनी मोदींचा दुटप्पीपणा उपस्थित जनसमूदायासमोरे ठाकरी शैलीत राज ठाकरे यांनी मांडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *