२००९ मध्ये राहुल गांधी यांनी मी ब्रिटनचा नागरिक आहे, असं सांगितलं होतं अशी तक्रार भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केली आहे. गृह मंत्रालयाने नोटिशीद्वारे यासंदर्भात नेमकं तथ्य काय आहे, हे सांगावं असं राहुल गांधींना म्हटलं आहे. नोटिशीला उत्तर देण्यासाठी राहुल यांना १५ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.

ब्रिटनमध्ये नोंदणी असलेल्या बॅकऑप्स लिमिटेड कंपनीच्या कागदपत्रांमध्ये ब्रिटिश नागरिक असल्याचा उल्लेख राहुल गांधी यांनी 2003 मध्ये केला आहे, असं सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. राहुल या कंपनीचे संचालक आणि सचिव होते. तसेच 2005-2006 या वर्षांसाठीचा वार्षिक रिटर्न भरताना राहुल यांनी ब्रिटिश नागरिक असल्याचं म्हटलं आहे, असं स्वामी यांचं म्हणणं आहे.

मात्र जनतेच्या मुद्यांपासून लक्ष भरकटावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा खटाटोप असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितलं की, “राहुल गांधी भारताचे नागरिक आहेत हे समस्त जगाला माहिती आहे. पंतप्रधान मोदींकडे बेरोजगारी, शेतीची दुर्दशा, काळं धन या प्रश्नांवर समाधानकारक उत्तर नाही. नागरिकांचं लक्ष भरकटावं यासाठीच त्यांचा खटाटोप सुरू आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *