लोकसभा निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर मोदी-शहांच्या विरोधात राज ठाकरेंच्या सभांची चर्चा गाजत आहे. अशातच नवी मुंबई मनसे च्या वतीने चक्क चि. चौकीदार व चि.सौ.का थापाबाई यांचा आगळा वेगळा विवाह सोहळा येत्या दिनांक २९ एप्रिल रोजी साजरा होणार आहे.

हे आंदोलन नवी मुंबई शहर अध्यक्ष श्री. गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली छेडण्यात आले आहे. या अनोख्या विवाहसोहळ्यानिमित्त मोदी-शहा विरोधात मतदान करा असेही आव्हान मनसे कडून करण्यात आले आहे. या विवाहसोहळ्याची लग्नपत्रिकाही सर्व जनतेला वाटली जात असून , त्यात सहभागी होण्यासाठी आग्रहाचं आमंत्रण देण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *