मुंबईतील खार उपनगरात युनायटेड फॉस्फरस लिमिटेड कंपनीच्या इमारतीमध्ये भारतीय जनता पार्टीकरता ईलेक्ट्रॉनिक कार्ड बनवण्याचे अवैध कृत्य सुरु होते. निवडणूक आयोगाची परवानगी नसतानाही सदर कार्ड बनविण्याचे अवैध काम चालू होते. यामध्ये सर्जिकल स्ट्राइक, हवाई दलाचे विमान तसेच भारतीय लष्काराची प्रतिमा वापरण्यात आल्या आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इलेक्ट्रॉनिक संदेश त्यात रेकॉर्ड केलेला असून असून, हे कार्ड उघताच तो उघडणाऱ्यांना ऐकू जावा अशी रचना त्या कार्डात केलेली आहे. सैन्याचा वापर प्रचाराकरता करु नये असे निर्देश असतानाही हे कारनामे करण्यात आलेले आहेत. निवडणूक आयोगाने जप्त केलेला हा एकूण माल ६ कोटी रुपयांचा असून प्रत्येक कार्ड ३०० रुपयांचे आहे. यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना सचिन सावंत म्हणाले की, . ‘मै भी चौकीदार’ म्हणणारे चोर आहेत हे पुन्हा स्पष्ट झाले आहे. करोडो रुपयांचे अशाप्रकारचे प्रचारसाहित्य निवडणूक आयोगाच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून वापरण्याचा भाजपाचा मानस असल्याचे स्पष्ट दिसून येतो.”

निवडणूक अधिकारी व खार पोलीस यांच्यासमोरच भाजपची ही कृष्णकृत्ये उघडकीस आल्याने तात्काळ भाजपाचे अध्यक्ष अमित शहा आणि युनायटेड फॉस्फरस लिमिटेड कंपनीचे मालक या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेस पक्षातर्फे सचिन सावंत यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *