नवी दिल्ली । प्रसिद्ध अभिनेते आणि  भाजपाचे विद्यमान खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दिल्ली येथे काँग्रेसच्या मुख्यालयात काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षाचे सदस्यत्व स्विकारले. भाजपमध्येच असून त्यांनी पक्षाच्या कामावर सतत हल्ला चढवत होते. त्यानंतर शेवटी त्यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

जड अंतकरणाने मला माझा जुना पक्ष (भाजपा) सोडावा लागत आहे. मात्र, यामागचे कारण सर्वांनाच माहिती आहे. भारतरत्न नानाजी देशमुख, महान पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि आमचे मित्र-गुरु लालकृष्ण आडवाणी यांच्यासारख्या निष्ठावंत मार्गदर्शकांचा भाजपा सोडताना दुःख होत आहे. मात्र, नाईलाजाने मी आता अन्यायाला कारणीभूत ठरणाऱ्या आणि लोकशाहीला हुकूमशाहीत परावर्तीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे शत्रुघ्न सिन्हा यांनी यावेळी म्हटले.

मात्र, आता काँग्रेस प्रवेशानंतर मला आशा आहे की, एकता, समृद्धी, वाढ, विकास आणि प्रतिष्ठा यामाध्यमातून मला लोकांच्या, देशाच्या आणि समाजाच्या सेवेची संधी मिळेल. काँग्रेस पक्ष हा महात्मा गांधी, नेहरु, पटेल आणि इतर महान राष्ट्र पुरुषांचा पक्ष आहे. काँग्रेसचे सध्याचे अध्यक्ष राहुल गांधी हे आजचे आणि उद्याचे गतिशील, सक्षम आणि यशस्वी चेहरा असलेले नेते आहेत. त्यामुळे मी चांगल्या दिशेने चाललो असल्याची जाणीव मला आहे. दीर्घकालीन लोकशाहीच्या दिशेने जाताना लालू आणि तेजस्वी यांच्या राजदसोबत मी आहे, असे यावेळी सिन्हा म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *