मुंबई – बीसीसीआयने आयपीएल टी-२० स्पर्धेतील साखळी सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ६ एप्रिल ते ५ मेदरम्यान होणाऱ्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून साखळी सामन्यांच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. लवकरच क्वालिफायर आणि अंतिम सामन्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

Ipl 2019 वेळापत्रक

याआधी लोकसभा निवडणूक जाहीर न झाल्यामुळे बीसीसीआयने २३ मार्च ते ५ एप्रिलपर्यंतच्या सामन्यांचे वेळापत्रक फेब्रुवारीमध्ये जाहीर केले होते. या दोन आठवड्यात फक्त १७ साखळी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. आता एकूण ५६ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यामुळे सगळ्या संघाच्या साखळी सामन्यांचे चित्र स्पष्ट झाले आहे. आयपीएलच्या वेबसाइटवर साखळी सामन्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. लोकसभा निवडणूक एप्रिल-मे महिन्यात सात टप्प्यांत पार पडणार आहेत. त्यामुळे बीसीसीआयने निवडणुका, दुपारचे सामने, शनिवार-रविवारी होणारे सामने आणि संघांचे दौरे या सगळ्या बाबी लक्षात घेऊन वेळापत्रक जाहीर केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *