आतापर्यंत आपण वेगवेगळ्या धर्मावर, जातीवर चित्रित केलेले सिनेमे पाहिले. मात्र महाराष्ट्रात अशी एक जमात आहे, जी नेहमीच मागासलेली आणि सध्याच्या सोयीसुविधांपासून वंचित राहिली आहे, ती म्हणजे आदिवासी जमात. ही जमात कशी होती आणि हे लोक कुठंपर्यंत प्रवास करु शकतात आणि आयुष्यात काय करु शकतात, ह्या विषयावर भाष्य करणारा ‘ऑनलाईन मिस्टेक’ हा मराठी सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे.

आस्क मोशन फिल्म्स प्रस्तुत ह्या चित्रपटाचे निर्माते अरुण किनवटकर असून त्यांचा निर्माता म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. त्याचबरोबर ते स्वत: आदिवासी कुटुंबातले आहेत. नुकतेच ह्या चित्रपटातील पहिल्या गाण्याचे रेकॉर्डिंग करण्यात आले. सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर आणि गायिका वैशाली माडे यांच्या आवाजात हे गाणे स्वरबद्ध करण्यात आले आहे.

डॉ. राज माने आणि विनोद संतोषराव डवरे ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. समाजाने दुर्लक्षित केल्यामुळे आदिवासी लोक कसे व का नक्षलवादी बनतात, ह्या विषयावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट असल्याचे चित्रपटाचे निर्माते अरुण किनवटकर यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, ह्या चित्रपटात आदिवासी आणि राजघराण्यातील सुंदर अशी प्रेमकथा दाखवली आहे. त्याच्यावर आधारित ‘माझ्या रानफुला’ असं एक सुंदर रोमँटिक गाण्याचे रेकॉर्डिंग करण्यात आलं. सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर आणि गायिका वैशाली माडे ह्यांनी हे गाणं गायले आहे. ह्या गाण्याचे संगीतकार दिनेश अर्जुना आणि गीतकार श्रीकृष्ण राऊत आहेत.

‘माझ्या रानफुला’ हे गाणं माझ्यासाठी आजपर्यंत संगीत दिलेल्या गाण्यांपैकी खूप वेगळं आणि हटके गाणं असल्याचे संगीतकार दिनेश अर्जुना यांनी सांगितले. तर गायिका वैशाली माडे सांगते की, गाण्याचे बोल इतके अप्रतिम आहेत की, हे गाणं गाताना ते आपल्या खूप जवळचे वाटते. तसचं हे गाणं गाताना एक आल्हाददायक अनुभव मिळतो, असे गायक स्वप्नील बांदोडकर म्हणाला.

ऑनलाईन मिस्टेक ह्या चित्रपटात गणेश यादव, रोहन पेडणेकर, प्रल्हाद चव्हाण, विशाल पाटील, आदिती कांबळे, साया काशिद, अस्मिता खटखटे प्रमुख भूमिकेत आहेत. तसेच ह्या चित्रपटाचे नृत्यदिग्दर्शन नरेंद पंडित करणार असून, रवि चंदन हे कॅमेरामन आहेत.

13 Comments

 1. Hi, I do believe this is an excellent website. I stumbledupon it 😉 I
  will come back yet again since I book marked it. Money and freedom is the best way to change, may you be rich and continue to help others.

  You’ve made some really good points there. I checked on the
  web to find out more about the issue and found most people will
  go along with your views on this web site. Hi would you mind sharing which
  blog platform you’re working with? I’m going to
  start my own blog soon but I’m having a difficult time choosing between BlogEngine/Wordpress/B2evolution and Drupal.

  The reason I ask is because your design and style seems different then most blogs and
  I’m looking for something completely unique.
  P.S Apologies for getting off-topic but I had to ask! http://foxnews.net/

 2. I’ve been surfing online more than 3 hours today,
  yet I never found any interesting article like yours.
  It is pretty worth enough for me. Personally, if all site owners and bloggers made good content as you did, the internet will be much more useful than ever before.
  It’s very simple to find out any matter on net as compared to books, as I found this post
  at this web site. It is appropriate time to make a few plans
  for the longer term and it is time to be happy.

  I’ve learn this publish and if I may I wish
  to suggest you few interesting issues or advice. Maybe you can write next articles relating to
  this article. I wish to learn even more issues approximately
  it! http://Dell.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *