youth dangerous sexual habits असा विषय असलेलं पत्र माझ्या टेबलावर येऊन थडकले आणि हा सादरीकरणाचा कार्यक्रम घेऊनच टाकू, असे मनाशी ठरविले. कार्यक्रम झाला आणि त्यातील सर्वेक्षण नोंदी तसेच संपूर्ण जगातील तरूण वर्गाच्या लैंगिक सवयींबद्दल माहीती मिळाली तेव्हा अंगावर काटा आला. चुकीच्या पध्दतीने होत असलेले किशोर वयीन मुलांचं sexual orientation हा ठळक मुद्दा आणि मूळ कारण असा निष्कर्ष त्या कार्यक्रमातून निघाला तेव्हा मुद्दाम दाबुन ठेवलेला आणि हेतूपूर्वक दुर्लक्षित केलेला लैंगिक कुतूहलाचा विषय पुढे जाऊन वेगळयाच विकृती समोर आणतो, हे पाहून खूपच वाईट वाटलं.

लैंगिक शिक्षण हा शिवाय वाढत्या वयातील मुलांसाठी महत्वाचा आहे. त्याबद्दल खूप चर्चा होतात, पण शाळेत त्याबद्दल ‘लज्जा’ या नावाखाली खूप मर्यादित स्वरूपाचं जागरूकतेचे कार्यक्रम होतात तर दुसर्‍या बाजूला इंटरनेटवर विविध मार्गानी मुलं त्यांचं कुतूहल गमविण्यासाठी प्रयत्न करतात अशीही पालक आणि शिक्षकांची ओरड असते. या दोन्हीही टोकाच्या व्यवस्थांमध्ये निरोगी चर्चा किंवा नैसर्गिक अभिमूखता हा प्रकार गैरहजरच राहतो. या सगळ्या गोंधळात, किशोर वयीन मुलांच योग्य नैसर्गिक आणि मनोरंजनात्मक असे लैंगिक शिक्षण कसं करता येईल, हा विचार करत असतांनाचा ‘वाफाळलेले दिवस’ हया नाटकाचा प्रयोग पहाण्याची संधी मिळाली.

‘वाफाळलेले दिवस’ ही प्रतिक पुरी यांची कांदबरी अतिशय वाचनीय आहे हे माहिती होते परंतु कांदबरीच्या संपादित भागावरील अभिवाचनाचा प्रयोग ही खरोखरच एक अप्रतिम साहित्यकृती आहे, पालकांनी आणि शिक्षकांनी आपल्या पाल्यांना आणि विद्यार्थ्यांना सोबत घेऊन पहावी अशी ही कलाकृती आहे. किशोरवयीन मुलं आणि लैंगिक कुतुहल आणि गरजा हा मूळ विषय असल्यामुळे कुठेही सेक्स कॉमेडी किंवा सर्वेक्षणातील आकडे किंवा गंभीर कथा आणि त्यांचं परिणाम अथवा लैंगिक गुन्हयांचा संदर्भ, असे काहीही न देता एका नैसर्गिक अनुभवातून विषय थेटपणे मांडला जातो.

एका निमशहरी भागातील एक शाळेत जाणारा अतिशय साधासा मुलगा, जो स्वत:मधील शारीरिक बदलांमुळे अस्वस्थ होतो आणि आपल्या समवयस्क मुला-मुलींचे भावविश्‍व सध्या असेच गुंतागुतीचे आहे का? याचा सूचक शोध घेतो. या शोध प्रक्रियेमध्ये त्याला खूप मजेदार पण मनुष्य प्रजातीच्या लैंगिकतेबद्दल तितक्याच खर्‍या आणि नैसर्गिक बाबी समजतात आणि पूर्ण १२० मिनीटे प्रेक्षकांना हसून आडवे करणारा हा प्रयोग, शेेवटी त्याच प्रेक्षकाला प्रश्‍न विचारून अंर्तमुख करतो आणि बाहेर जाताना विचार करायला लावतो. जर माझ्या आजूबाजूच्या सगळयाच मुलांमध्ये होणारे शारिरिक बदल सारखे आणि नैसर्गिक आहेत, तर सगळयांना या विषयी एवढे भेदरवून, घाबरून का ठेवले गेले आहे? मुलांनी घरात याबद्दल कोणालाही काही बोलायचे किंवा विचारायचे का नाही? जर ‘तुमचे आमचे सेम’ असे आहे तर माझे ते चांगले तुझे ते वाईट असा ढोंगीपणा लैंगिकतेमध्ये का आणायचा? मुलांनी समवयस्कांमध्ये याबद्दल घाबरत का होईना चर्चा करायच्या पण मुलींना बोलू द्यायचे नाही किंवा याबद्दल ‘न बोलाण्याचेच Training जास्त देत रहायचे. पुरूाकेंद्री चौकटीत अडकलेले स्त्री-चारत्र्य, अशा पध्दतीने मुलींचे लैंगिक संवेदीकरण केले जाते. त्यामुळे ही जीवापेक्षा पण जास्त जपली जाणारी, कुठेही वाच्यता न करण्यासारखी गोट आहे हे बिंबवले जाते. कांदबरीच्या अभिवाचनात सूचकरित्या प्रकाश व संगिताचा उपयोग करून दिग्दर्शक राहुल लामखडे यांनी जिवंतपणा आणला आहे. आठवीतला एक मुलगा स्वत:च्या शारिरिक बदलांबदल सतत त्याचा गुरू म्हणवणार्‍या ‘नित्या’ या एका बिनधास्त मुलासोबत बोलत असतो आणि नित्या ही व्यक्तिरेखा त्याचे शंकानिरसण करत असते. नित्याच्या व्यक्तीरेखेमध्ये किरण नागपुरे यांनी विदर्भिय भाषा लकबीत अतिशय धीटपणे संवादफेक केली आहे. त्यामुळेच या छुप्या आणि so called बंससमक घाणेरडया म्हणवल्या जाणार्‍या विषयाला वाचा फुटते आणि त्यातूनच हे अभिवाचन प्रेक्षकांना अभिमुख करते.किशोर वयात होणारे लैंगिक बदल, त्यातून विरूध्द लिंगी आर्काण, मग त्याचा नैतिक – अनैतिकतेशी संबंध, भावना-प्रेम- आर्काण-प्रणय अशा सगळ्याच पातळयांवर होणारा गेांधळ आणि परत पुन्हा या गोटीला असलेले सामाजिक अधिठान या प्रत्येक टप्प्यावर एक माणूस म्हणून स्वत:ला समजून घेणे, प्रत्येक मुलाला आणि मुलीला जमले पाहीजे, हे इथे लेखकाने आणि दिग्दर्शकाने अधोरेखित केले आहे.‘लैंगिक शिक्षण’ या विायावरील औपचारिक सादरीकरणाला बर्‍याच वेळा मर्यादा येतात. त्यामध्ये बर्‍याच वेळेला त्याचा रोख Hygiene, psychology, reproduction विषयांकडे गेलेला जाणवतो. समुपदेशनात नाटकाचा प्रयोग करून मनोरंजनात्मक मार्गाने लैंगिक अभिमुखता/संवेदीकरण यशस्वीरित्या करता येईल म्हणून ‘वाफाळलेले दिवस’ या नाटकाचे प्रयोग प्रामुख्याने शैक्षणिक संस्थामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हावे.

-डॉ.सीमा घंगाळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *