पानच्या वायव्य भागातील अर्शियामा क्योटो प्रांतात १६ स्क्वेअर किमी परिसरात सगॅनो बांबू फॉरेस्ट वसलेलं आहे. जपानच्या पर्यटनस्थळांमधील हे एक महत्त्वाचं नैसर्गिक सौंदर्याने नटलेलं ठिकाण आहे. या बांबूच्या बनातील बांबूच्या झाडांमधून वाहणार्या वार्यामुळे शीळ घातल्यासारखा निर्माण होणारा आवाज जपानचं एक वैभव आहे. उंचच उंच हिरव्यागार बांबूच्या झाडांमधून जाणार्या मार्गावरून फिरणं किंवा सायकलवरून रपेट मारणं हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. या रस्त्याला जवळपास ३०० मीटर्स लांब असं बांबूच्या झाडांचं दुतर्फा कुंपण घातलेलं आहे. संध्याकाळी हा परिसर दिव्यांनी उजळून निघतो. या बांबूच्या वनामुळे परिसरातल्या अनेक कारागिरांना रोजगारही मिळाला आहे. प्रसिद्ध अशा झेन बुद्धिस्ट मंदिराकडे जाण्याचा मार्ग इथूनच जात असल्यामुळे पर्यटकांची नेहमीच इथे गर्दी पहायला मिळते. याच बांबूच्या बनाची ही फोटोसफर…

3138

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *